आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. मात्र अनिल देशमुख आज सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जबाब नोंदवण्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले.
आज ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर त्यांनी एक पत्रंही पोस्ट केलं आहे. हे पत्रं कोणताही मंत्री, नेता, तपास यंत्रणा किंवा जनतेला उद्देशून नाही.
हे ही वाचा : येत्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा
मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझं आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखं आहे. त्यात काहीच लपवून ठेवलेलं नाही, असं अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत.
Satyamev Jayate pic.twitter.com/q8q59BvsSV
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
एमआयएमचा बडा नेताराष्ट्रवादीच्या वाटेवर? ऑडिओ क्लिप व्हायरल; चर्चांना उधान
शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा
“भाजप आणि ड्रग्ज पेडलर बद्दल बोलूया म्हणत, नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो”