अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आल्या होत्या. पण आता ज्योती देवरे यांची बदली करण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली करण्यात आल्याचे समजते जाहिर निषेध आहे या महाविकास आघाडी सरकारचा हे सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे, असा घणाघात चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली करण्यात आल्याचे समजते
जाहिर निषेध आहे या महाविकास आघाडी सरकारचा
हे सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/z7wqocVJ5Y
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2021
दरम्यान, ज्योती देवरे यांनी महिला आयोग आणि नाशिकच्या महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल समितीने दिला. तसेच त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, भाजप आमदार अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार
शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे- धनंजय मुंडे
“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, तर रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात माॅडेल?”
बलात्काऱ्याला आमच्या ताब्यात द्या, इथं न्याय होणारच! मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या