नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकार विदर्भातील ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सरकार मात्र पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग आहे., असा टोला बावणकुळेंनी लगावला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. अशा बैठकांमुळे कोरोना विषाणू सुपर स्प्रेडर बनत आहे., असंही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, याकडे सरकारातील नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हे (FIR) दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात 28 दिवसांचा लाॅकडाऊन करा; माजी खासदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण”
पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव; बेंगलोरने दिली दमदार विजयी सलामी
“…तर लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल”