…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण

0
401

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना, एक मोठं विधान केलं आहे.

मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केलं. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश

आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीही वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवभोजन थाळी चालू राहणार की बंद?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, थापा शिंदे गटात का गेले?; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here