आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : त्रिपुरा येथील घटनांच्या निषेधार्थ राज्यात मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले होते. या वेळी अमरावतीमध्ये काही समाजकंटकांनी दुकानांवर दगडफेक केली. तसेच काहींना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने ‘अमरावती बंद’चे आवाहन केलं होतं.
भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले होते. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता. या हिंसाचारानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भूमिका मांडली आहे.
हे ही वाचा : बेस्टच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यापासून सत्ताधाऱ्यांचा पळ; भाजपाचा शिवसेनेवर निशाणा
राज ठाकरे हे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून, या दौऱ्यात त्यांनी संघटना बांधणीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी साहेबांचा आदेश म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
“अमरावतीमध्ये जो झाला, तो प्रयत्न जर पुन्हा महाराष्ट्रात झाला तर सोडायचं नाही. पुन्हा डोकी वर काढू द्यायची नाहीत. प्रत्येकाला आपल्या घरावरती आणि घराजवळच्या चौकावरती आपल्या पक्षाचा झेंडा सतत फडकत ठेवला पाहिजे. नविन वर्षापासून धूमधडाका सुरु करु,” असं राज ठाकरे या म्हणाले आहेत.
साहेबांचा आदेश pic.twitter.com/becw99lfhQ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“माझे महात्मा गांधी फक्त आणि फक्त राज ठाकरे”
“अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन, अमित शहांच्या मुक्कामासाठी स्वत:चा कोट दिला”
भाजप सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?; छगन भुजभळांचा सवाल