मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेसुद्धा अडकले होते. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या टी.व्ही.9 मराठीशी बोलत होत्या.
दरम्यान, धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“अवघ्या 3 वर्षांत भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्यानं केला काँग्रेसमध्ये गृहप्रवेश”
“वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यामुळंच पब-बार बिनधास्त सुरु”
कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत?- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजप आमनेसामने; एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी