मुंबई : कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने सकाळी 10 ते 5 या वेळेत दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठिंबा देत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
“महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून सर्व दुकानं खुली करण्यात येणार असून सर्व व्यापारी बांधवाबरोबर आम्ही आहोत!! महाराष्ट्र सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे,” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात एक किंवा दोन आठवड्यांची टाळेबंदी लागू होऊ शकते. यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून सोमवारपासून सकाळी 10 ते सायंकळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने उघडी ठेवली जातील’, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्टीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून..
सर्व व्यापारी बांधवान बरोबर आम्ही आहोत!!
महाराष्ट्र सरकार नी कुठला ही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) April 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
बेअरस्टो, पांडेचे झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ ; कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय
“शरद पवारांच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील”
…हे भाजपाचे राजकारण नाही तर काय सुरू आहे – नवाब मलिक