Home क्रीडा ……म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचं मत

……म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचं मत

दुबई : इंडियन प्रिमियर लीग 13 व्या हंगामाला शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2020 पासून सुरूवात होत आहे. पहिला सामना 12 व्या हंगामातील चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. मात्र अशातच स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाने माघार घेतल्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. तसेच मलिंगाच्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याचा संघात समावेश करण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅन्डलवर पॅटिनसनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

स्वतःचं मतं सांगायचं झालं तर जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांसोबत काम करणं अत्यंत उत्साहपूर्ण असणार आहे. अशातच जसप्रित बुमराह जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. आणि ट्रेंट बोल्ट ही संघात आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे, असं जेम्स पॅटिन्सनने म्हटलं आहे.

दरम्यान, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बुमराह आतापर्यंत आयपीएलचे 77 सामने खेळला असून  आतापर्यंत त्याने 82 विकेट्स घेतले आहेत. आयपीएलच्या 12व्या सीझनमध्ये 19 विकेट्स घेत बुमराह मुंबईतील सर्वोत्तम गोलंदाज बनला होता.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावी; ‘या’ नेत्याने केली मागणी

जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?; उर्मिला मातोंडकरांचा केंद्राला सवाल

अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा; शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन

‘ही’ शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय?; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला सवाल