मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. यावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसतील तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. तसंच सरकार आणि वकिलांमध्ये समन्वय नाही असंच सिद्ध होतंय. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद आहे., असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राशिद खानची शानदार बाॅलिंग; सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी विजय
उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे…; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
भाजप सोडून कुणीही जाणार नाही- गिरीश महाजन