आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. यावरून आता ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
ठाकरे गटाच्या नगरसेविका किरण धराडे- गामने यांनी याबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याचा विषय अजित पवारांनी संपविला, म्हणाले…
या पत्रात त्यांनी, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल लिहिलं आहे. संजय राऊत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, राऊत असोत की आव्हाड, यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. माझ्यासह पाच नगरसेविका शिंदे गटात सामील होण्यासाठी तयार आहोत., असं किरण धराडे यांनी पत्रात म्हटलं.
शिंदे गटाकडून आम्हांला बदनाम करण्याचे काम केलं जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात. यासाठी आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. आमच्या नेत्यांवर निदान खोटे गुन्हे तरी दाखल केले जाणार नाहीत. शिंदे यांना त्यांची संघटना वाढविण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, तर आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. त्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु, आमच्या नेत्यांवर होणारे खोटे गुन्हे आम्ही मान्य करणार नाही. ते गुन्हे तुम्ही मागे घ्या. आम्ही तुमच्या संघटनेत सहभागी होऊ, असंही किरण धराडे यांनी या पत्रात नमूद केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आमच्या शिवरायांना विकू नका, नाहीतर…; सामनाचा रोख कुणाकडे?”
…म्हणून मी, माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
“गजानन किर्तीकरनंतर आता ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडून, शिंदे गटात प्रवेश करणार”