Home महाराष्ट्र …म्हणून अंत्यविधीला 20 जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी- संजय राऊत

…म्हणून अंत्यविधीला 20 जणांना तर दारुच्या दुकानासमोर हजारोंना परवानगी- संजय राऊत

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. तिसऱ्या टप्प्यात सरकारनं मद्यविक्रीलाही परवानगी दिली आहे. त्यानंतर देशभरातील अनेक दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अंत्यविधीला केवळ 20 जणांना जमण्यास परवानगी देण्यात आली कारण त्या देहामध्ये आत्माच नसतो. मात्र, दारूच्या दुकानांवर मात्र हजारो लोकांना परवानगी आहे. कारण दुकानांमध्ये उत्साहीता आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोणत्याही लसीशिवाया निघून करोना व्हायरस; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

“औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले मजूर कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी”

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट

उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…