आनंदातून शोकाकडे! स्मृती–पलाशचा विवाह थांबला; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

0
410

सांगली ● भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचे लग्न रविवारी (23 नोव्हेंबर) सांगलीतील एका फार्म हाऊसमध्ये होणार होते. दोन्ही कुटुंबांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मात्र, लग्नाआधीच आलेल्या धक्कादायक घटनेमुळे आनंदाचं वातावरण एकदम दुःखद झालं आणि अखेर विवाहसोहळा रद्द करण्यात आला आहे.

काय घडले?

लग्नाच्या केवळ काही तास आधीच स्मृती मानधनाच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तत्काळ उपचार सुरू केले असून वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुटुंबियांची रुग्णालयात धाव

घटनेनंतर स्मृती मानधना आणि तिच्या कुटुंबाने त्वरित रुग्णालयात धाव घेतली. पलाश मुच्छल यांचे कुटुंबही रुग्णालयात दाखल असून दोन्ही कुटुंबीय या कठीण परिस्थितीत एकत्र आहेत.

विवाहसोहळा अनिश्चित काळासाठी रद्द

वडिलांची धोकेदार प्रकृती आणि घरातील अचानक निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे स्मृती–पलाश यांचे लग्न अनिश्चित काळासाठी रद्द केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नवीन तारीख कधी ठरवली जाईल, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण

भारतीय क्रिकेटमधील संवेदनशील क्षण, तसेच संगीत क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा असलेला पलाश यांचा विवाहसोहळा रद्द झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी दोन्ही कुटुंबीयांना धीर देत नातेवाईक लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here