लग्न रद्द… आता फोकस फक्त भारतासाठी खेळण्यावर — स्मृती मंधानांची अधिकृत घोषणा”

0
211

सांगली-:भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि लाखोंच्या हृदयात घर करणारी स्मृती मंधाना हिने अखेर गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावरून दिलेल्या निवेदनात तिने लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

स्मृतीने लिहिले आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा आणि चर्चांचा भडिमार सुरू आहे. मी खूप खाजगी आयुष्य जगणारी व्यक्ती आहे, पण या क्षणी स्पष्ट सांगणे आवश्यक आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे.”तिने पुढे सर्व चाहत्यांना आणि माध्यमांना शांत राहण्याचे आणि या विषयाला इथेच पूर्णविराम देण्याचे आवाहन केले आहे.

“दोन्ही कुटुंबांची गोपनीयता जपा. आम्हाला आमच्या पद्धतीने या काळातून पुढे जाण्यासाठी थोडा वेळ आणि अवकाश द्या,” असे ती म्हणाली.

🎯 ‘देशासाठी खेळणेच माझे ध्येय’ — स्मृतीचा निर्धार कायम

निवेदनात स्मृतीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल असलेली बांधिलकीही पुन्हा एकदा स्पष्ट केली.“माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा उद्देश नेहमीच माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा राहिला आहे. मी शक्य तितक्या वर्षांपर्यंत भारतासाठी खेळत राहू इच्छिते आणि देशासाठी अधिकाधिक ट्रॉफी जिंकणे हेच माझे लक्ष राहील,” असा दृढ विश्वास तिने व्यक्त केला.

🙏 चाहत्यांप्रती कृतज्ञता — “आता पुढे जाण्याची वेळ आली आहे”चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिने संदेशाचा शेवट केला —“तुमच्या सततच्या समर्थनाबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here