अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
भारताने एक डाव आणि 25 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने स्लिपमध्ये उत्कृष्ठ झेल टिपत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स डॅनियल लॉरेन्ससोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. अशात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही जोडी फोडण्यासाठी फिरकीपटू अक्षर पटेलकडे डावातील 44 वे षटक सोपवले. अक्षरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फोक्स आउटसाइड एजला चौकार मारायला गेला. परंतु आधीपासूनच रहाणे तिथे सावध उभा होता.
रहाणेने चेंडू आपल्याकडे येताच डाव्या अंगास डाईव्ह मारली आणि अगदी मैदानालगत चेंडू असताना झेल पकडला. यावेळी त्याने झेल पकडायच्या आत चेंडूने मैदानाला स्पर्श केला का नाही?, ही शंका उपस्थित झाली. अखेर तिसऱ्या पंचांनी तपासणी केल्यानंतर कळाले की, रहाणेने चेंडू मैदानावर पडायच्या आतच झेल घेतला होता. अशाप्रकारे फोक्स 46 चेंडूत 13 धावा काढत झेलबाद झाला.
#INDvENG #Rahane #masscatch #fileding @ajinkyarahane88 @RanjiKerala pic.twitter.com/ogDS7us16j
— Midhun Palayadan (@MidhunPalayada1) March 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुंडे, शेख, राठोड अगदी निरागस आहेत आणि…; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराची टीका
सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका- धनंजय महाडिक
भारताचा इंग्लंडवर विजय; सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक
“मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं”