आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आध्यक्ष पवार यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तरही दिले. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता संदीप काळे याने पाटीलांना ‘नवरत्न’ तेलाची बाटली पाठवून संदेश दिलाय.
‘आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का? बोलताना जरा डोक शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमच डोक शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमच डोक शांत नाही झाल तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो, असं संदीप काळे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली”
चंद्रकांत पाटील, आपल जेवढे वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हव. मी तुम्हाला हे परत परत सांगते आहे. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये, असं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटील यांना सुनावलं.
दरम्यान, शरद पवारांवर टीका करताना ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी 60 वर तो गेला नाही.’ असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“भाजपनं प्रचारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जरी आणलं तरी शिवसेना घाबरत नाही”
“मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना”