आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होऊनही एक महिना होत असला तरी, अजूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर यामधील आमदार हे शिंदे गटातून बाहेर पडतील, असं अजित पवार म्हणाले होते. यावरून आता शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर तुम्ही हे दाैरे केला असता का?; अमित ठाकरेंचा, भाऊ आदित्य ठाकरेंना सवाल
सत्तांतर झाल्यापासून अजित पवार यांना राजकारण कमी आणि भविष्यवाणी अधिक कळू लागलं आहे, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी यावेळी लगावला. तसेच लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि जो काही निर्णय मुख्यमंत्री यांचा असेल तोच सर्वांना मान्यही असेल, त्यामुळे विरोधकांनी कोणतीही काळजी न बाळगता राज्यात होत असलेला विकास पहावा, असा सल्लाही शहाजीबापूंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्ष प्रवेशाचा धुमधडाका सुरुचं; अनेक युवक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
शिवसेनेचा भाजपाला धक्का; भाजपाच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश