मुंबई : मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मंत्रालयातील उपाहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याची बातमी मी पाहिली. विशेष म्हणजे मंत्रालयात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येते. तरीसुद्धा आत दारूच्या बाटल्या गेल्या कशा हा सर्वांना प्रश्न पडला आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री गेले दीड वर्ष मंत्रालयात न गेल्याने अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच – आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय ही राज्यात परिस्थिती
आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सामान्य प्रशासन आणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचं उत्तर महाराष्ट्रला द्याव. शासन प्रशासन करतंय काय. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं, अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी यावेळी केली आहे.
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच –
आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परीस्थिती @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @SMungantiwar @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/9M1Ga7dL2V— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 10, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…मग हा टाइमपास कशाला? निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
मंदिर बंद ठेवून, बार सुरू करणं हे या सरकारचं धोरणच; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं पहिलं राज्य ठरणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल