पुणे : मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याबाबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. तसेच विनायक मेटेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
राज्य सरकारने अशा प्रकारची याचिका दाखल करण्याची आवश्यकता होती. पण यांनी फक्त टीका करण्यात समाधान मानलं. आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचं सोडून हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसलंय. आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, असा आरोपही विनायक मेटे यांनी यावेळी केला.
सगळंच जर केंद्र सरकारने करायचं तर तुम्ही काय करणार आहात?, असा प्रश्न मेटे यांनी यावेळी राज्य सरकारला केला. तसेच पत्र लिहून किंवा हाता पाया पडून आरक्षण मिळत नाही, असा टोलाही मेटे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, पुढच्या 5 तारखेनंतर बीडवरुन मोर्चा निघणार. लॉकडाऊन असला तरीही मोर्चा काढू. त्याचबरोबर मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आवाहनही करु, असा इशारा मेटे यांनी राज्य सरकारला दिला.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचाराची गरज- अशोक चव्हाण
जयंत पाटील हे शांत स्वभावाचे, मीच तापट; कुंटे-पाटील वादात तथ्य नाही- अजित पवार
कोरोना विरूद्धच्या लढाईत भारत अजून हरलेला नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
धनंजय मुंडेेंसोबतच्या नात्यासंबंधीचा उलगडा पुस्तकातून करणार; करूणा मुंडेंची पोस्ट चर्चेत