Home देश राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबीयांचा यात काहीही संबंध नाही; भाजप...

राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत ठाकरे कुटुंबीयांचा यात काहीही संबंध नाही; भाजप नेत्याचं वक्तव्य

लखनौ : मनसेचे नेते राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी राम मंदिर आंदोलनातील ठाकरे कुटुंबीयांची भूमिका नाकारली आहे.

“राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका सारखीच आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं ब्रीजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत.

हे ही वाचा : …तर राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजपच्या ‘या’ खासदाराचा इशारा

“उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी. राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये, असंही ब्रीजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“तुम्ही मशिदींवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, आणि आता ते हिंदुंच्या गळ्यापर्यंत आलं”

हनुमान चालिसावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भोंग्याच्या निर्णयावरून शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले…