पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला सुरुंग लागण्याची चिन्हे ; 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

0
713

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांगडे यांच्या भोसरी प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या युवक विधानसभा अध्यक्षांनी रवी लांडगे यांना फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून रवी लांगडे भाजपच्या कार्यकारणीवर नाराज आहेत. आपल्याला डाववलं जात असल्याची त्यांच्या मनात भावना आहे. मला सगळे पर्याय खुले आहेत. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी पुढील भूमिका स्पष्ट करेन, असं रवी लांडगे म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, नगरसेवक नेवाळे यांच्यासह भाजपाचे जवळपास 30 नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भाजपाला भोसरी विधानसभेतच सुरुंग लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यपालांवर दबाव, त्यांनी प्यादं बनू नये- संजय राऊत

काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा; फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं

“11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करता शेवटचा अर्ज”

संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय – नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here