“शुभमन गिल-वेंकटेश अय्यरची विस्फोटक खेळी; कोलकाताचा आरसीबीवर एकतर्फी विजय”

0
332

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आज राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने बेंगलोरचा 9 विकेट्सनी पराभव केला.

बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बेंगलोरचा हा निर्णय फेल गेला. व त्यांचा पूर्ण संघ केवळ 19 षटकात केवळ 92 धावाच करू शकला. बेंगलोरकडून सलामीवीर देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. तर कोलकाताकडून वरूण चक्रवर्ती व आंद्रे रसेलने प्रत्येकी 3, लाैकी फर्ग्युसनने 2, तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली.

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुभमन गिल व वेंकटेश अय्यरने विस्फोटक सुरूवात केली. दोघांनी केवळ 9.1 षटकात 82 धावांची सलामी देत कोलकाताला धमाकेदार विजय मिळवून दिला. कोलकाताकडून गिलने 33 चेंडूत 48 धावा केल्या, तर वेंकटेश अय्यरने 27 चेंडूत 41 धावांची विस्फोटक खेळी केली. तर बेंगलोरकडून युझवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

फडणवीस सरकारच्या काळातील काही मंत्र्यांच्या फाईल बाहेर येणार- नाना पटोले

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्नं; रूपाली चाकणकरांचा टोला

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग; पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच्यांसह अनेकांच्या हाती घड्याळ

“देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत; 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here