पुणे : इंग्लंडविरूद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
श्रेयसची ही दुखापत भारतीय संघ आणि आयपीएलमधील गतवर्षीचा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्ससाठीदेखील हा खूप मोठा धक्का आहे. कारण श्रेयस आयपीएलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतोय.
ईएसपीएन क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयसच्या खांद्याची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे आगामी दोन वन डे सामन्यांना तो मुकणार आहेच, तसेच तो आगामी आयपीएलमध्ये सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. तर काही माध्यमांनी दावा केला आहे की, श्रेयस अय्यर आयपीएलमधील अर्ध्याहून अधिक सामन्यांमध्ये उपलब्ध नसेल.
दिल्लीचा संघ अजिंक्य रहाणे, आर अश्विन, स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद न सोपवता एका तरुण भारतीय खेळाडूच्या नावाचा विचार करत आहे. त्या खेळाडूचं नाव आहे ऋषभ पंत. भारतीय संघातील आक्रमक डावखुरा फलंदाज असलेला ऋषभ पंत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थापन ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवू शकतं.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
“मोठी बातमी! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”
पुण्यात लाॅकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत शाळा, काॅलेज बंद राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी- रूपाली चाकणकर