Home महाराष्ट्र भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का?; रोहित पवारांचा प्रश्न

भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का?; रोहित पवारांचा प्रश्न

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर अनधिकृतरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरणी सीताराम कुंटे यांनी दिलेला अहवाल हा मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी तयार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही ‘अनुभवी’ नेत्याचं म्हणणं आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे.

मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल., असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं कौतूक; म्हणाले…

“राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी”

“… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”

शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हे तपासण्याची गरज- नाना पटोले