आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला.
शरद पवारांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र तरीही शरद पवार निर्णयावर ठाम राहिले. शरद पवार राजीनामा मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण करू, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. उपोषण करत असलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी समजावलं. शरद पवारांनी निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ मागितला आहे, पण कार्यकर्त्यांनी उपोषण सोडलं नाही, तर मात्र निर्णयाचा पुनर्विचार होणार नाही, असं शरद पवारांनी सांगितलं असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या राजीनाम्यावर सुषमा अंधारेंचं, पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष नेमताना समितीची स्थापना करावी, अशी सूचना शरद पवारांनी केली आहे. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष केलं जाऊ शकतं, तर शरद पवार सल्लागाराच्या भूमिकेत असतील, असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, याबाबत शरद पवारांनी काही संभाव्य नावंही सांगितली आहेत. या नावांमध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, के.के.शर्मा, पी.सी.चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहन, हे पदाधिकारी अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतील, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सूरू, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गाैफ्यस्फोट
“शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं हे…”; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
शरद पवार यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…