Home मुंबई धक्कादायक! विरार येथे रुग्णालयाला आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू

धक्कादायक! विरार येथे रुग्णालयाला आग, 13 करोना रुग्णांचा मृत्यू

मुंबई : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच आता विरार येथे एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात 17 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

विराटसेनेचा विजयी चौकार; बेंगलोरचा 10 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले.

महत्वाच्या घडामोडी –

लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…- अमृता फडणवीस

“भाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून काँग्रेस नेत्यांना ट्रोल करण्याचं काम सुरु”

“RCB VS RR IPL-2021! राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय”