“धक्कादायक! वरळीमध्ये इमारत कोसळली, चाैघांचा मृत्यू तर अनेक जखमी”

0
246

मुंबई : मुंबईतील वरळीत निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 7 पेक्षा अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत.

वरळीतील N.M. जोशी मार्गाच्या हद्दीतील हनुमान गल्लीत ‘ललित अंबिका’ ही इमारत आहे. या निर्माणाधीन इमारतीत काही काम सुरु होतं. मात्र काम सुरू असतानाचा ही लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना केएम आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी तर मनापासून मदत करा”

स्वतःचं पद वाचवण्यासाठी मुख्यमंत्री घरी काळी जादू करत असतात, तशीच…- नितेश राणे

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

“सांगली, कोल्हापूरातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here