धक्कादायक! पुण्यात भाजप नेत्याची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

0
182

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यातील भाजपच्या एका नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. सुनील धुमाळ असं आत्महत्या केलेल्या भाजप नेत्याचं नाव असून ते पुण्याच्या भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

मंगळवारी सकाळी हडपसर भागातील साडेसतरानळी येथे रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे भाजपच्या पुण्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी; सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतून निलंबन

सुनील धुमाळ यांनी आत्महत्या का केली?, याचा उलगडा अजून होऊ शकलेला नाही. त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही, त्यामुळे यासंदर्भात स्पष्ट कळू शकलेलं नाही. रेल्वे पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

दरम्यान, सुनील धुमाळ यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

102 डिग्री ताप, अनेकवेळा उलट्या; जाणून घ्या आता कशी आहे दाऊदची तब्येत

लेखिका-लघुपटकार अंजली कीर्तने काळाच्या पडद्याआड

मोठी बातमी! भाजपच्या गोटात धुसफूस; ‘या’ नेत्याचा पत्रकार परिषद घेत राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here