“धक्कादायक! भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार”

0
302

पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात घूसून 6 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच ही महिला स्थानिक भाजप कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं म्हटलं जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिला आपल्या घरी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. तसंच नुकताच त्या महिलेला मेंदूघाताचा झटका आला होता. यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही, असं पोलिसांनी म्हटलं. तसेच यावेळी या महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 6 आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून, शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांची नावं आहेत. हे दोन्ही आरोपी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत., अशी माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संभाजीराजे कडाडले

तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचि

“देशाला 2014 पासून ग्रहण लागलंय, स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक आज सत्तेत आहेत”

लोकल सुरू करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here