उध्दव ठाकरेंना धक्का; ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेची कारवाई

0
318

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे.

ही बातमी पण वाचा : “उद्धव ठाकरेंनी बंड थांबवलं असतं, पण…; ‘या’ नेत्याचं मोठं विधान”

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा असून शिवसेना ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचं हे कार्यालय आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कार्यालयावर आता कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय आता तोडण्यात येत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात का केली?; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार

जागतिक MSME दिना निमित्त ‘उद्योग – व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे’ आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here