Home महाराष्ट्र शिवसेनेला मोठा झटका! एकनाथ शिंदेंसह 13 आमदार नॉट रिचेबल

शिवसेनेला मोठा झटका! एकनाथ शिंदेंसह 13 आमदार नॉट रिचेबल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणावर फुटल्याने भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत 13 आमदार ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निवडणुकांपूर्वी पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे ही  वाचा : योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार; पुढील 2 महिन्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार”

एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यांच्या फोनवर कॉल केल्यानंतर गुजराती टोन ऐकू येत आहे. सध्या एकनाथ शिंदे गुजरातमधल्या सुरत इथल्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांची गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची माहिती  समोर आली आहे.

दरम्यान, या माहितीनंतर आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

विधान परिषद निवडणूक निकाल! भाजपाचे पाच उमेदवार विजयी, तर काँग्रेसला मोठा धक्का

MLC Elections 2022! शिवसेनेच्या दोन्ही शिलेदारांचा विजय, राज्यसभेचा वचपा काढला”

राज ठाकरे यांच्यावर लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पुर्ण; राज यांची प्रकृती स्थिर