मुंबई : दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.
युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
रायगडाच्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते- जयंत पाटील
भाजपला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं- प्रवीण दरेकर
“अशोक चव्हाण यांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”
“राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”