Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना कधीही लक्ष्य केलं नाही; सुप्रिया सुळे मोदींवर कडाडल्या

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना कधीही लक्ष्य केलं नाही; सुप्रिया सुळे मोदींवर कडाडल्या

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी वाराणसी दौरा केला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल भाष्य केलं.

हे ही वाचा : “मोठी बातमी! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण”

भारतात अनेक सल्तनती आल्या आणि गेल्या. अनेक आक्रमक आले आणि गेले. मात्र, पवित्र काशी या सर्वांना पुरून उरली, असं मोदी म्हणाले. आक्रमकांनी काशीवर अनेक आक्रमणे केली. शहराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धर्मवेडाने झपाटलेल्या औरंगजेबाने तलवारीच्या धाकावर येथील संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाची माती जगावेगळी आहे. येथे औरंगजेब आला तर त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराज या भूमीत जन्मतात, असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवाजी महाराज हे अन्यायाविरुद्ध लढले. शिवरायांनी आपल्या लढाईत कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी-सीबीआयच्या माध्यमातून महिला मंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबांना लक्ष्य केलं जातं,  असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

‘जब हम दो साथ खडे, तो…; रुपाली पाटलांच्या राजीनाम्यानंतर मनसे नगरसेवकाचं ट्विट होतंय व्हायरल

“राज्यातील भाजप नेत्यांनी वारंवार महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण…”

सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ