आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिल्वासा : दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, आज सिल्वासा येथे शिवसेनेचे उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा झाली.
आदित्य ठाकरेंनी यावेळी सभेला संबोधित करताना, सिल्वासामध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असं म्हणत विश्वास व्यक्त केला.
हे ही वाचा : गोवा भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या दलदलीत फसलं आहे; शिवसेनेची टीका
या भागाशी आणि शिवसेनेचे फार जुने नाते राहिले आहे. 22 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. त्यानंतर आज मी ठाकरे कुटुंबातील सदस्य म्हणून येथे आलेलो आहे. येथील लोकांना, भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ही निवडणूक लढत आहे. डेलकर कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कलाबेन यांना आम्ही उमेदवारी दिली आहे., असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेनेला या भागाचा विकास करायचा आहे. यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याकडे लक्ष घालणार असून, ते विजयी सभेसाठी येथे येणार आहेत. सभेला झालेली गर्दी लक्षात घेता कलाबेन विजय होणार हे मी आताच जाहीर करतो. इथले लोक शिवसेनेला किती मानतात हे यावरुन दिसत आहे. 22 वर्षांपूर्वी बाळासाहेब येथे आले होते. मात्र तेव्हा दोन प्रवाह होते. मात्र विचारधारा एक होती. आता दोघांचे विचार एकत्र आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विजय नक्कीच होणार, असा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप; भाजपचे ‘ते’ 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
छोटे पवार कमी पडले म्हणून मोठे पवार मैदानात उतरले; चंद्रकांत पाटलांचा टोला
विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये; नीलम गोऱ्हेंचा टोला