“दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राष्ट्रीय राजकारणात येणार”

0
461

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करतील, असं मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत हे तीन दिवासीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिका अंतर्गत असलेल्या रुग्णालयाला ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय’ असे नाव देण्यात आले. यावेळी संजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांवर कुणी दबाव टाकत असेल तर भाजप आंदोलन करेल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा टोला

शिवसेनेचा पक्षविस्तार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेना पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक जिंकणार आहे. मी स्वतः त्यावर लक्ष घालून आहो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचाराला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तिथली जागा जिंकून शिवसेना राष्ट्रीय राजकारणात उतरेल. त्यानंतर उद्धव ठाकरे हे पण राष्ट्रीय राजकारणात उतरतील., असं संजय राऊत म्हणाले.

विकासकामे ही शिवसेनेची ओळख आहे. जर देशात कुठल्याही राज्यातील उत्तम चालणारे सरकार असेल तर ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार उत्तम चालत आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

नोकरीबाबत सल्ला घेण्यासाठी वडिलांनी शरद पवारांकडे नेलं- दिलीप वळसे पाटील

नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार- संजय राऊत

“सत्तेचा गांजा नसानसात भिनल्याने, समीर वानखेडेंच्या बायकोवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here