जुन्नरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार; ‘या’ नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0
789

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच बाळासाहेब आणि बाजीराव दांगट हे दोन्ही बंधू आज `मातोश्री`वर गेले आहेत.

हे ही वाचा : आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर…; कोल्हापूरात खासदार धैर्यशील मानेंविराधोत शिवसैनिक आक्रमक

जुन्नरमध्ये पुन्हा भगवा फडकविण्याची ठाकरे यांनी साद घातल्यानंतर बाळासाहेब आणि बाजीराव दांगट या दोन्ही बंधूंनी आज `मातोश्री`वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेच घेतली. यावेळी दांगट बंधूंनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा शब्दही दिला. तसेच जुन्नरमध्ये मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती ठाकरेंना दिली.

दरम्यान, या वेळी शिवसेनेचे नंदूरबार संपर्कप्रमुख आणि मूळचे जुन्नर तालुक्यातील असणारे बबन थोरात, निलेश बाळासाहेब दांगट हे उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…

“आता काँग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here