सोलापूर : औरंगाबादच्या नामांतरावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं. लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल, असं रोहित पवार यांनी म्हटंल आहे.
दरम्यान, शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक कर्नाटक पोलिसांना भिडले
इथे तांडव का नाही?; सामना अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला सवाल
“पराभव मान्य करा नाहीतर लोकंच तुडवतील एक दिवस”
…त्यामुळे मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे- जयंत पाटील