मुंबई : शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात करोनाशी लढण्यासाठी लष्कराची गरज नाही. शिवरायांनी आपल्याला लढायचं कसं ते शिकवलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाउन म्हणजे गतिरोधक आहेत. आपण करोना विषाणूची गती रोखली आहे. मात्र त्याची साखळी तोडण्यात आपण अजून यशस्वी झालेलो नाही. आपल्याला ही साखळी तोडून हे संकट संपवायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातले सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत. करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे हे विसरु नका, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे”
औरंगाबादचं मृत्यूतांडव सुन्न करणारं…; मनसेनं वाहिली श्रद्धांजली
एकनाथ खडसे आणि पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल- चंद्रकांत पाटील
विधान परिषद उमेदवारांच्या निवडीवर खडसेंनी सोडलं मौन; म्हणाले…