आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता जळगावमध्ये शिवसेनेनं भाजपचे नगरसेवक फोडून गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला आहे.
भाजपाच्या प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे या 4 नगरसेवकांनी भाजपला धक्का देत शिवबंधन हाती बांधलं. शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
हे ही वाचा : “Goa Election! शिवसेना खासदार संजय राऊत-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”
शिवसेनेचे महापालिकेतील बहुमत कमी झाल्याने चिंता वाढली होती. आता शिवसेनेचे बहुमत वाढल्याने महापालिकेत निर्णय घेतांना शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे. भाजपमध्ये गेलेल्या या बंडखोर नगरसेवकांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून ललित कोल्हे होते. त्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं असून या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का, औरंगाबादमधील ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
“जळगावमध्ये 50 रूपयांच्या उधारीसाठी पुतण्यानं घेतला काकाचा जीव”