शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो- आशिष शेलार

0
165

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळावा अयोजीत केला होता. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलच सुनावलं. यावरुन शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो होता, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो होता. उद्धव ठाकरे यांना सत्ता टिकेल याविषयी फार शंका आहे. त्यामुळेच ते नेहमी सरकार पाडून दाखवा, अशी ओरड करतात. मात्र यावर आमच्या नेत्यांनी आधीच सांगितलंय की, हिंमत असेल तर सरकार चालवून दाखवा, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत हिंमत असेल तर बाहेर उतरून दाखवा, असं म्हणायची वेळ आली आहे, असा टोलाही शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तामिळनाडू सरकारला जे जमलं ते आपल्याला का जमत नाही?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला प्रश्न

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल”

“मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली”

“केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here