आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.
भाजपचे विद्यमान उपसरपंच सुधा पवेकर व तारळे ग्रामपंचायतीमधील 2 सदस्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी व सदस्यांनी शिवबंधन हाती बांधलं.
हे ही वाचा : “केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”
दरम्यान, तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक पाच वर्षापूर्वी पार पडली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची आघाडी झाली होती. तसेच शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणे, याच हेतुने राष्ट्रवादीनं व भाजपचे युती केली होती. मात्र आता या आघाडीत आता मतभेद सूरू झाले असून याचा फायदा शिवसेनेनं घेतला असून भाजपचे विद्यमान उपसरपंच सुधा पवेकर व ग्रामपंचायत सदस्य प्रणिल यादव, किरण सोनावले यांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजप व राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”
आता मनसेकडूनही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी; कोकण भवन कार्यालयासोमर काढला भव्य मोर्चा
‘…तर तुमचे वांदे होतील’; निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना टोला