Home महाराष्ट्र शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना ‘व्हिप’ जारी

शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना ‘व्हिप’ जारी

मुंबई :  राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्यावतीनं सर्व आमदारांना व्हीप काढण्यात आला आहे.

अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना  जारी केला आहे.

विधिमंडळाच्या नियमित कामकाजासोबत या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता असल्यानं सेनेच्या या व्हिपला महत्व प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज संस्थांमधील रद्द झालेलं अतिरिक्त आरक्षण, कोरोना रुग्णसंख्या, कोरोना लसीकरण, अनिल देशमुख प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे घटलेलं दर यामुळे  विरोधी पक्ष भाजप सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेनं देखील दक्षता म्हणून त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते”

पंतप्रधान मोदी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत”

“संजय राऊतांनी 6 आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं, आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”

“आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीही नाहीत, मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक”