आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चिपळूण : आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष आपली संघटना मजबूत करत असून इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावत आहेत. अशातच कोकणात शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे.
राष्ट्रवादीचे खंबीर शिलेदार म्हणून ओळख असलेले तोंडलीचे सरपंच मेघजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा : “युझवेंद्र चहल RCB तून बाहेर; विराट कोहलीसह ‘हे’ खेळाडू संघात कायम”
आमदार भास्कर जाधव यांच्यावर विश्वास व्यक्त करत तोंडली सरपंच मेघजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी सोमवारराष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवबंधनात अडकले. गावचा विकास व्हावा आणि गावचे सुपुत्र शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही सेनेत प्रवेश केल्याचे सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, भास्कर जाधव यांच्यासह तालुकाप्रमुख संदीप सावंत, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ सावंत, महेश सावंत, अजय सावंत, प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत चिपळूणमधील शिवसेना संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
महत्वाच्या घडामोडी –
ममता बॅनर्जींच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; शिवसेना-तृणमूल आघाडी होणार?
नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; भाजप नेत्याचा सवाल