शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का; मनसेच्या अनेक महिला नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
3128

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी 2022 मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी पक्ष मजबुतीसाठी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. अशातच शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे.

मनसेच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या उपाध्यक्ष सुगंधा शेट्ये यांनी प्रभाग क्रमांक 52 च्या महिला अध्यक्ष, 8 महिला उपशाखाध्यक्ष यांच्यासह येथील अनेक महिलांनी उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अंधेरी पूर्व, विजयनगर येथील सिंम्फोनी हॉल मध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्थानिक खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी आयोजित केला होता. यावेळी हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगला.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा

अजित दादांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकावं, नाहीतर…; संजय राऊतांचा इशारा

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here