आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा : “मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता”
भाजपचे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दत्ता बंडगर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान, उस्मानाबाद शहरात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विश्वासू लोकांच्या यादीत दत्ता बंडगर यांचं नाव होतं. तसेच त्यांची कामगिरी पाहता डॉ.पाटील यांनी त्यांना नगराध्यक्षपदाची संधीदेखील दिली होती. तसेच अनेक वर्षे ते नगरसेवक म्हणून काम करत होते.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा आरोप
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेचा पराभव का झाला?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; रत्नागिरीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश”