आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
माथेरान : माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी 27 मे रोजी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून खळबळ माजवली होती. भाजपमध्ये गेलेल्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मोठा दणका दिला. भाजपवासी झालेल्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे.
माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला.
हे ही वाचा : “अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही भास्कर जाधवांनी शरद पवारांची साथ सोडली”
माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र घोषित केले आहे.
प्रसाद सावंत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. याबाबतची अखेरची सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी सुनावणीचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज नऊ नगरसेवकांसह एक स्वीकृत अशा दहाही भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित आहे. तसा आदेश सर्व नगरसेवक यांना पोस्टाने पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”; नारायण राणेंची टीका
जळगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; भाजपचा ‘हा’ मोठा नेता असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत
मनसे प्रमुख राज ठाकरेंची कोरोनावर मात