शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

0
389

नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमच्याबरोबर युती करून लढली, केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्याचा फायदा करून घेण्यासाठीच शिवसेना आमच्यासोबत होती. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतही छुपी युती केली होती, असा मोठा गाैफ्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती ही गेल्या निवडणुकीतच होती. शिवसेना हा पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आम्हाला कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना ही पाठित खंजीर खुपसणारा पक्ष आहे. भाजपच्या पाठित शिवसेनेनं खंजीर खुपसला आहे. शिवसेनेने महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे. त्यामुळे जनता शिवसेनेला उभं करणार नाही, अशी टीकाही बावनकुळेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“राडा करणाऱ्यांना काल शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका”

“एकटा संभाजी काय करणार?; त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार- किशोरी पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here