Home महाराष्ट्र नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, त्यामुळे…; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, त्यामुळे…; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : आगामी नगरपरिषद निवडणुकांवरुन केंद्रीय सुक्ष्म लघु आणि माध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते मीडियाशी बोलत होते.

जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्यांनी यावं आणि नगरपरिषदा घेऊन जाव्या असं व्हायला आम्ही काही डोळे मिटून आहोत का?. शिवसेनेची ताकद काय आहे? चारही नगरपरिषदा आमच्या आहेत. आमच्याकडेच राहणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद आहे. असं नारायण राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “राज्यभरातील शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा”

दरम्यान, चारही नगरपरिषदा आम्ही आमच्या ताब्यात येऊ द्या. या सरकारने जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांना पैसे कुठे दिले? एवढं नुकसान झालं. पण पाच पैसे दिले नाही. मग मतदारांनी यांना निवडून का द्यावं, असा सवालही नारायण राणेंनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली भाजप आमदाराची भेट; मनसे-भाजप युती होणार?”

“नारायण राणे ज्या पक्षात जातात, त्यांची सत्ता जाते, त्यामुळे भाजपलाही धोका होऊ शकतो”

निवडणूक आल्यानंतर उसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला