आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपने सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला आहे. आसाममधील आमदारांच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीसाठी भाजपने कोणती रणनीती आखली याबाबतही त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : दंगलखोरांना थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील अशी तिन्ही पक्षांना भीती- चंद्रकांत पाटील
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जनता सरकारच्या धोरणाला कंटाळली आहे. या सरकारला लोकशाही मार्गानेच हटवू आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारू, असं जेपी नड्डा म्हणाले आहेत. तसच भाजप येणार, मुंबई घडवणार… असा नारा देत मुंबईतील भाजपा पदाधिकारी आणि आमदारांना त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं.
दरम्यान, मागील वर्षी महापालिका निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी असल्याने भाजपला महापालिकेत सत्ता मिळू शकली नव्हती. मात्र यंदा भाजप निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. भाजपाला ज्या प्रभागात कमी जागा मिळाल्या, त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्यांकडे ताकदीने लक्ष देण्याच्या सूचना जेपी नड्डा यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“अमरावतीतील वातावरण तापलं; सलग 4 दिवस संचारबंदी, इंटरनेट सेवा बंद”
“शरद पवार-उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”
कंगणा रणाैतविरूद्ध शिवसेनेचं आंदोलन; कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी