मुंबई : नेत्यांनी पूरस्थिती असलेल्या भागात पर्यटन टाळावे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. तसचं आजच्या ‘सामना’मधून संजय राऊतांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केलं आहे. याला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जनता आता समोर येऊन राग व्याक्तअ करु लागल्याकमुळे शिवसेना हादरुन गेली व त्याेमुळेच सामना मध्यें एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरुन सिध्दज होते, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याेचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू., असंही नारायण राणेंनी म्हटलंय.
लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करुन घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर, म्हणतात…
“अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा दुसरा टी-20 सामना रद्द”
“ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले”