मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय; मनसेचा आरोप

0
513

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय, असा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. नांदगावकर यांनी यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईकरांच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी महापालिकेकडून 1000 ते 1500 कोटी रुपयांची तरतूद झालेल्या निधीत ई निविदा काढताना सत्ताधारी पक्षाच्या दबावात येऊन अभियत्यांकडून भ्रष्टाचार होत असून महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी या पत्रात केला.

हे ही वाचा : ‘शिवसेनेच्या खासदारांनाच वाटतं की हे सरकार कधी पडतंय’; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

देखभाल विभागाच्या अभियंत्यांकडून अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचं महापालिकेतील मराठी व्यवसायात संघर्ष करणारे कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांचं निवेदन जोडत आहे., असं नांदगावकर यांनी म्हटलं.

महापालिकेच्या निधीतून जाहीर होणाऱ्या ई निविदांमध्ये विभागाचे अभियंते आणि सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक यांच्या संगतमताने मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे देण्याकरिता निविदा प्रथम नियुक्तम कार(L1) पात्र होऊन पण आदेशाची पुर्तता करण्यात येत नाही. विभागात परिपत्रक काढून रक्कमेच्या १५ टक्के पेक्षा अधिक खालच्या दराने निविदा पात्र होणाऱ्या कंत्राटदारांना दर विश्लेषण देऊनही कामे परस्पर रद्द केली जातात हा महापालिकेच्या निधीचा अपयव्य आहे असा आरोप नांदगावकर यांनी पत्रात केला.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता शिवसेनेच्या वाटेवर?; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

माजी गृहमंत्री काय हनीमूनला गेले काय?; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here